मी सारखा झोपेतून उठतो की पडलं का काय सरकार; अजितदादांनी उडवली चंद्रकांत पाटलांची खिल्ली

ajit pawar chandrakant patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण महाराष्ट्र झोपेत असताना हे ठाकरे सरकार पडेल अस विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता अजितदादांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करताना चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. मी सारखा झोपेतून उठतो की पडलं का काय सरकार! अस म्हणताच सगळीकडे हशा पिकला.

अजित पवार म्हणाले, चंद्रकांत पाटील मोठा माणूस आहेत. ते म्हणाले आहेत की, मी जर बोलायला लागलो तर फार फटकळय. अमकंय तमकंय… कशाला उगाच त्यांच्या नादी लागायचं. आपलं दुरून डोंगर साजरे. ‘मी वाटच पाहतोय की सरकार कधी पडतंय. सारखा झोपेतून उठतो की पडलं का काय सरकार! लगेच टीव्ही लावतोय. हे चॅनेल लाव, ते चॅनेल लाव…. कितीदा सांगायचं की हे तीन नेते एकत्र आहेत तोपर्यंत कुणी मायचा लाल हे सरकार पाडू शकत नाही”, असा टोला अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावलाय.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते-

लोकं झोपत असताना कधीही सरकार पडेल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. 18 महिन्यांपुर्वी सरकार आल्यापासून कुठल्याही क्षणी जाईल यासाठी बॅग भरुन तयार असतानाही 18 महिने त्यांना सरकार मिळाले आहे. यामध्ये कोविड एक भाग आहे तसेच कदाचित त्यांचे नशीबही असेल असेही ते म्हणाले होते.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.