मुंबई |सुनिल शेवरे
‘मागास आयोगाचा अहवाल प्रसिद्ध होण्यापूर्वीच मुख्यमंत्री आरक्षणसंदर्भात कशी काय घोषणा करू शकतात?’ असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून “वा रे..फडणवीस तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल निकम्मी है जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है” अशी घोषणाबाजी करत राष्ट्रवादीने काँग्रेस कडून जोरदार आंदोलन करण्यात आले.
यावेळी मराठा आरक्षण संदर्भात राज्य मागास आयोगावर अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले. धनगर आरक्षणा बाबत सरकार बेजबाबदापणे वागत असून आपली जबाबदारी केंद्रावर ढकलत आहे असं म्हणून पवार यांनी हे सरकार शब्दांची फसवणूक करणार सरकार आहे असं म्हणत फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.
मागास आयोगाच्या कामकाजात प्रत्यक्ष हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. ओबेसी आरक्षणाला धक्का न लावता व ५२ टक्के आरक्षणला धक्का न लावता सरकार ने मराठा, मुस्लिम, धनगर,लिंगायत आरक्षणाची घोषणा करावी हि मागणी प्रामुख्याने करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील ,विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे, विद्या चव्हाण , काँग्रेसचे विखे पाटील पदाधिकारी तसेच जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
दुष्काळाबाबत सरकार गंभीर नसून शेतक-यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या, मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाबाबत तात्काळ निर्णय घ्या या मागणीसाठी आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधीमंडळाच्या पाय-यांवर आंदोलन केले. pic.twitter.com/fi7O0n92gB
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) November 19, 2018