सचिन वाझेला भाजपची खासदारकी पक्की! ; अमोल मिटकरींनी साधला निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसुख हिरेन हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या सचिन वाझे यांच्या लेटरबॉम्ब मुळे राज्यात खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या दोघांनीही खंडणी मागण्यासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप सचिन वाझे यांनी केला आहे.

SBUT वरील चौकशी थांबवण्यासाठी व बृहन्मुंबई महापालिकेच्या काही ठेकेदारांकडून पैसे वसूल करण्यास सांगितल्याचे सचिन वाझे याने आपल्या पत्रात नमूद केलं आहे.यावरून राजकारण तापायला लागले आहे. भाजपकडून जोरदार टीका केली जात असून, अनिल परब यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान, सचिन वाझेच्या या आरोपानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी काही प्रश्न उपस्थित करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. ‘सचिन वाझे बद्दल अनेक शंका दिसतात. )NIA मुळे 1)प्रत्येक वेळी भाऊ सोबत. 2)आरोपी असुन देखील वाझेंचे राहणीमान. 3)आरोपी सारखी वागणूक नाही. 4)स्वतः जागोजागी पेरलेले संशयास्पद पुरावे 5) मुद्दाम CCTV समोर जाणे. 6)अचानक लेटर बॉम्ब 7)परमवीर चे राजकीय नातलग… पुढे भाजपची खासदारकी पक्की!’ असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group