हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरणाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपला आक्रमकपणा दाखवून दिला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मोदींना तब्बल 4 वेळा पत्र लिहून देखील मोदींनी भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.
यानंतर मराठा समाजामधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तसेच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियाद्वारे संभाजीराजेंना एक आवाहन केले आहे. ‘मोदींना आग्रा दरबारातील शिवशक्तीचा प्रत्यय पुन्हा दाखवण्याची वेळ आलीये’ असे ट्विट मिटकरी यांनी केलेय.
महाराज साहेब नरेंद्र मोदींना महाराष्ट्राचे, मराठा आरक्षणाचे काही गांभीर्य नव्हतेच. आता यांना आग्रा दरबारातील शिवशक्तीचा परत एकदा प्रत्यय दाखवण्याची वेळ आली आहे. आपण आमचा स्वाभिमान आहात.@YuvrajSambhaji https://t.co/x5UdUBqfW9
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 20, 2021
महाराज साहेब नरेंद्र मोदींना महाराष्ट्राचे, मराठा आरक्षणाचे काही गांभीर्य नव्हतेच. आता यांना आग्रा दरबारातील शिवशक्तीचा परत एकदा प्रत्यय दाखवण्याची वेळ आली आहे. आपण आमचा स्वाभिमान आहात.’ असे म्हणत संभाजीराजेंच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी असल्याचे सांगितले आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.