तुम्ही ईडी दाखवली आता सीडीही निघणार ; राष्ट्रवादीचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वीच भाजपला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेल्या जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. तसेच ‘ईडी’ने 30 तारखेला एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस बजावण्यात आल्याचे वृत्त समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यावर तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मागच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीने नोटीस पाठवली होती. आता खडसेंना पाठवली आहे. खडसेंमुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपचे बुरुज ढासळायला लागले आहेत. त्या धास्तीने केंद्र सरकारकडून हे दबावतंत्र वापरले गेले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

एकनाथ खडसे यांनी पक्षप्रवेश केला त्याचदिवशी त्यांनी हे ईडीची नोटीस देतील, असं सांगितलं होतं. पण ते ईडी देतील तर मी सीडी दाखवील, असं विधान त्यांनी केलं होतं. ईडी दाखवली तर सीडीही निघणार आहे. भाजपचं हे दबावतंत्राचं राजकारण आहे. भाजप हुकूमशाही गाजवत आहे. या कारवाईला काही अर्थ नाही, असंही मिटकरी म्हणाले आहे.

ईडीचा उपयोग आपल्या विरोधकांना दाबण्यासाठी – छगन भुजबळ

दरम्यान,मंत्री छगन भुजबळ म्हणाले, एकनाथ खडसेंना नोटीस मिळणारच होती. ईडीचा उपयोग आपल्या विरोधकांना दाबण्यासाठी होतोय. जो विरोधात बोलेल त्याला त्रास देण्याचा प्रयत्न होतो.असा आरोप त्यांनी केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’