फडणवीस राजकारणातील सर्वात लबाड माणूस; राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून जोरदार टीका होऊ लागल्याने याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यांकडूनही भाजपवर आता हल्लाबोल केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिल गोटे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. फडणवीस हे राजकारणातील सर्वात लबाड माणूस आहेत, आशा शब्दात गोटे यांनी टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिल गोटे यांनी रात्री मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप व फडणवीस यांच्यावर आरोप करताना म्हंटले आहे की, जनतेचा पाठिंबा असलेले अर्थात मास लीडर संपवण्याचे काम फडणवीस करत आहेत. चंद्रकांत पाटील हे काही मास लीडर नाहीत. त्यांच्या बोलण्यानं सत्य लपत नाही. भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे, असे म्हणत गोटे पुढे म्हणाले की, झोटिंग समितीच्या अहवालामुळे खडसेंना काही नुकसान होणार नाही ही गोहत सर्वांनी लक्षात घ्यावी.

महाविकास आघाडी सरकारमध्ये चाललेल्या घडामोडीबाबतही गोटे यांनी म्हंटले असून त्यांनी आघाडीतील नेत्यांनाही कानपिचक्या दिल्या आहेत. आघाडीत सत्तारुढ पक्षातील काही नेते विरोधकांना आवडतील अशी वक्तव्य करीत आहेत. आघाडीत सहभागी असलेले तीनही पक्ष स्वखुशीने सत्तेत आले आहेत. कुणीही कुणाला बळजबरी केलेली नाही. ती जबाबदारी आपण स्वेच्छेने स्विकारली आहे. ती आपली जबाबदारी ओळखूनच आनंदाने पार पाडली पाहिजे, असे गोटे यांनी म्हंटले आहे.