हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या दिल्लीत असून मोदी सरकार विरोधात शरद पवार मैदानात उतरले असून उद्या दिल्ली येथील निवासस्थानी देशातील एकूण 15 पक्षांच्या नेत्यांशी त्यांची उद्या बैठक असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक बडे नेते या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
आज सकाळीच प्रसिध्द रणनितीकार प्रशांत यांनी शरद पवार यांची भेट घेतली असून तब्बल 2 तास त्यांच्यात चर्चा सुरू आहे. देशातील विविध राजकीय परिस्थितीवर या दोघांच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान शरद पवार यांचे अन्य राज्यातील प्रादेशिक पक्षांसोबत अंत्यत चांगले संबंध आहेत. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, मायावती, लालूप्रसाद यादव, चंद्राबाबू नायडू हे पवारांच्या ऐकण्यातील आहेत. त्यामुळे आगामी काळात देशातील सर्व विरोधकांची एकत्रपणे मोट बांधून पवार भाजपला चारीमुंड्या चित करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.