मराठा आरक्षणासाठी वेळ पडल्यास रथीमहारथींनाही साष्टांग नमस्कार घालायला तयार- उदयनराजे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा । ‘मराठा आरक्षणाला प्रश्न सोडवण्यासाठी वेळ पडल्यास मी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालायला तयार आहे, असं विधान भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. याशिवाय आरक्षण हे गुणवत्तेनुसारच मिळाले पाहिजे, या भूमिकेचा पुनरुच्चारही त्यांनी केला. वेळ आल्यावर मी मराठा आरक्षणावर जाहीरपणे बोलेन. मात्र, राज्यातील वडीलधाऱ्या माणसांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. उदयनराजे यांच्या या वक्तव्याचा रोख शरद पवार यांच्या दिशेने होता. (BJP MP Udayanraje Bhosale on Maratha reservation)

सर्वोच्च न्यायालयात 9 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती. नोकरी आणि शैक्षणिक आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे राज्यातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरक्षण हे गुणवत्तेनुसारच मिळायला पाहिजे, या भूमिकेवर आपण अजूनही ठाम असल्याचे सांगितले. तसेच योग्यवेळी मी मराठा आरक्षणावर जाहीरपणे बोलेन, असेही त्यांनी सांगितले. (Udayanraje Bhosale)

काही दिवसांपूर्वीच मराठा ठोक क्रांती मोर्चाचे नेते आबा पाटील यांनी शरद पवार यांना मराठा आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली होती. शरद पवार यांनी राज्यात तीन पक्षांना एकत्र आणत महाविकासआघाडीचे सरकार स्थापन केले. त्याप्रमाणेच पवार यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्नही सोडवावा, अशी मागणी आबा पाटील यांनी केली होती. यासाठी लवकरच मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली होती.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

 

Leave a Comment