‘नाथाभाऊ काय चीज आहे, हे उभ्या महाराष्ट्राला दाखवून देऊ’; शरद पवार यांचा विरोधकांना थेट इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । गेल्या 4 दशकांपासून राजकारणात सक्रीय असलेले भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे आज (शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 11 दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत खडसेंचा पक्षप्रवेश झाला. या सोहळ्यादरम्यान शरद पवार यांनी खडसेंबाबत बोलताना गौरोद्गार काढले.

”नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आता संपूर्ण खान्देश राष्ट्रवादीमय होईल, यात मला शंका नाही. एकदा शब्द दिला म्हणजे त्यावरून नाथाभाऊ मागे हटत नाहीत, नाथाभाऊ काय चीज आहे तुम्हाला दाखवून देऊ,” असा सूचक इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाने खानदेशात राष्ट्रवादी पक्षाच्या उभारणीला मदत होणार असल्याचं मत व्यक्त केलं. खानदेशात नवं नेतृत्व उभं करण्याचं काम एकनाथ खडसे यांनी केलंय. त्यामुळेच त्यांना भाजपचे अनेक आमदार खासदार निवडून आणता आले. आता त्यांच्या नेतृत्वात खानदेशात राष्ट्रवादीची ताकद वाढेल, असंही शरद पवार यांनी नमूद केलं.

 

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in