मी तुमचा चाहता आणि प्रशंसक, तुम्ही मास्क घाला ; राष्ट्रवादीच्या नेत्याचं राज ठाकरेंना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाच प्रमाण वाढलं असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. प्रशासनाकडून मास्क बंधन घातल आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र पहिल्या पासूनच मास्क वापराला विरोध केला आहे. मी मास्क घालत नाही, तुम्हांलाही सांगतोय अस पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरेंनी म्हंटल होत. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी पत्र लिहून राज ठाकरेंना मास्क घालण्याचे आवाहन केले आहे.

क्लाईड क्रास्टो यांनी आपल्या पत्रात लिहिलं की ,मी तुमचा चाहता आणि प्रशंसक आहे. भल्याही आपल्या राजकीय विचारधारा सारख्या नसतील, पण तुमच्या भाषण कौशल्यामुळे आणि व्यंग्य चित्रमुळे मी तुमच्याशी जोडला गेलो आहे. खरंतर देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. शिवाय देशातील निम्मे कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आणि केरळ या राज्यात आढळत आहेत.

देशात अशी स्थिती असताना, राज ठाकरे यांनी सार्वजानिक ठिकाणी अशा प्रकारचं वक्तव्य करणं, सार्वजानिक हित्याच्या दृष्टीने घातक ठरू शकतं. कारण राज ठाकरेंचे लाखों चाहते, कार्यकर्ते त्यांना डोळे झाकून फॉलो करतात. अशा परिस्थित राज ठाकरे यांनी ‘मी मास्क घालतचं नाही’ असं म्हणणं सार्वजानिक आरोग्यासाठी हितावह नाही आहे, असं क्लाईड क्रास्टो यांनी राज ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like