राष्ट्रवादी, काँग्रेसच्या या नेत्यांचा भाजप प्रवेश…

Untitled design T.
Untitled design T.
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षबदल सत्र सुरूच आहे. मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते प्रविण छेडा आणि नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या डॉ. भारती पवार यांनी मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितीत होते. इतर भाजप नेत्यांसह पुण्यातील भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडेही यावेळी उपस्थित होते.

डॉ. भरती पवार यांनी राष्ट्रवादीतुन भाजपमध्ये प्रवेश केला असून दिंडोरी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास त्या उत्सुक आहेत. राष्ट्रवादीकडून दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांना उमेदवारी जाहीर झाल्याने, भारती पवार यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. पवार यांच्या भाजप प्रवेशामुळे दिंडोरीत भाजपचे पारडे जाड झाले आहे.

प्रवीण छेडा यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये आज प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री तसेच इतर भाजप नेते उपस्थित होते. ईशान्य मुंबईत किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे प्रवीण छेडा यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, गिरीश महाजन, सुभाष देशमुख, प्रकाश मेहता, आशिष शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
इतर महत्वाचे –

खाजगीकरणामुळे आरक्षण धोक्यात – पद्यश्री डॉ. सुखदेव थोरात

गोंदियात होळीकरता कोट्यावधींच्या झाडांची कत्तल..

गौतम गंभीर या पक्षातून लोकसभा निवडणूक लढणार…