नाशिक प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे दिंडोरी मतदारसंघाचे उमेदवार धनराज महाले यांची उद्या घर वापसी होणार आहे. अर्थात ते उद्या शिवसेनेत जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीला त्यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत जाणे पसंत केले होते. तेव्हा त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी करण्याची संधी देखील दिली मात्र भाजपच्या भरती पवार यांनी त्यांचा पराभव केला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या भारती पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे विद्यमान खासदार भालचंद्र चव्हाण यांचे तिकीट कापत त्यांनी उमेदवारी देखील मिळवली. तर भारती पवार यांची जागा भरून काढण्यासाठी राष्ट्रवादीने धनराज महाले यांना उमेदवारी दिली. मात्र भारती पवार यांनी त्यांचा पराभव केला.
दरम्यान दिंडोरी विधानसभेची जागा युतीमध्ये शिवसेनेकडे आहे. त्यामुळे धनराज महाले यांनी विधानसभा निवडणूक डोळयासमोर ठेवूनच शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला आहे. हे स्पष्ट दिसते आहे. उद्धव ठाकरे येणाऱ्या निवडणुकीला धनराज महाले यांना तिकीट देणार का हे देखील पाहण्यासारखे राहणार आहे. तर इकडे भारती पवार आणि धनराज महाले यांच्यासारखे दोन नेते राष्ट्रवादी सोडून गेल्याने राष्ट्रवादीला आदिवासी समुदायाच्या नेतृत्वाचा शोध घ्यावा लागणार आहे.
माढ्याच्या शिंदे बंधूनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ; सोलापूरच्या राजकारणात खळबळ
म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पूरग्रस्तांसाठी जमले २ दिवसामध्ये २० कोटी
विश्वजीत कदमांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट ; काँग्रेस नेत्यांनी भोवया उंचावल्या