गिरिश महाजनांना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवायला हवं – एकनाथ खडसे

Khadase mahajan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. त्याच दरम्यान, एकनाथ खडसेंचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्यांनी मानसोपचार तज्ञांकडे उपचार घेण्याची गरज आहे अशी टीका गिरीश महाजन यांनी केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले आहे. महाजनांना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवलं पाहिजे, अशी टीका खडसेंनी केली.

एकनाथ खडसे म्हणाले, नाथाभाऊंना ठाण्याच्या हॉस्पीटलमध्ये नेण्याची गरज नाही, पण गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवलं पाहिजे, असे म्हणत नाथाभाऊंनी खोचक टोला लगावला आहे. तसेच, आज मोक्यासंदर्भात जे छापे पुण्यात पडले ते आणि मी जे काल काही बोललो तो केवळ योगायोग समजावा, असेही खडसेंनी म्हटले.

दरम्यान, एकनाथ खडसेंचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्यांनी मानसोपचार तज्ञांकडे उपचार घेण्याची गरज आहे. ईडीची नोटीस मिळताच एका महिन्यात चार वेळेस कोरोनाचे खोटे सर्टिफीकेट त्यांनी मिळविले आहे असा आरोप गिरीश महाजन यांनी केला होता.