उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच – एकनाथ खडसेंची सिंहगर्जना

Eknath Khadse
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर ते भलतेच आक्रमक झाले असून भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. नुकतंच त्यांनी भाजपवर निशाणा साधताना आता मी भाजपला ताकद दाखवून देतो. उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच असेल, अस वक्तव्य केलं आहे. तसेच जळगावात भाजपचे अनेक कार्यकर्ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. हे कार्यकर्ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यताही एकनाथ खडसे यांनी बोलून दाखविली.

आज जळगावात भाजपच्या 60 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी एकनाथ खडसे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. रावेर तालुक्यातील 60 भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रोहिणी खडसे – खेवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांची इनकमिंग सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

खडसे – महाजन वाद वाढणार

फडणवीस सरकारच्या काळात गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एकनाथ खडसे यांचे प्रतिस्पर्धी म्हणून उदयाला आले. देवेंद्र फडणवीस यांनी नियोजनपूर्वक रसद पुरवून गिरीश महाजन यांना जिल्ह्यात मोठे गेले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन अशी दोन शक्तीकेंद्रे उभी झाली होती. आता एकनाथ खडसे भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.

यापूर्वी गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे गेल्याने भाजपला कोणताही फरक पडणार नाही, असे वक्तव्य केले होते. तेव्हा आगामी काळात कोणाच्या पाठी किती लोक उभे आहेत, हे दिसूनच येईल, असा पलटवार एकनाथ खडसे यांनी केला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’