राष्ट्रवादीचा हा माजी प्रदेशाध्यक्ष शिवसेनेच्या वाटेवर

0
63
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील गटबाजी, अंतर्गत कलह याचा शुकशुकाट लोकसभा निवडणुकीतच लागला होता. मात्र, आजचे राष्ट्रवादी पक्षाचे चित्र पाहता तो एवढ्या टोकाच्या निर्णयांपर्यत पोहचेल याची कोणाला कल्पनाही केली नसावी. राज्यात कॉंग्रेस पुरती गळाली आहे तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षालाच सोडचिठ्ठी देण्याचा ध्यास घेतला आहे. एकापोठोपाठ एक दिग्गज नेते राष्ट्रवादीला सोडत आहेत. पक्षातील मोठ्या नेतृत्वाचे नेते पक्षाला रामराम करत आहेत.

राष्ट्रवादीचे मुंबईचे माजी अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि कोककणातील ज्येष्ठ नेते भास्करराव जाधव हे देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे कळते. पक्षातील मतभेद, पदासाठींचा संघर्ष आता चव्हाट्यावर येत असून त्याचे परिणाम थेट पक्षअस्तित्वावर होताना दिसून येत आहे. सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर, पक्षाकडे जाधव यांनी मुंबई अध्यक्ष पद मागितले होते परंतू तेव्हा पक्षाने माझे एकले नाही असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.त्यानंतर आता भास्कर जाधव स्वत:च पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

भास्कर जाधव आणि नारायण राणे कोकणातील या दोन नेत्यांमध्ये सतत राजकीय संघर्ष होत असतो. त्यातच आता भास्कर जाधव हे शिवसेनेच्या संपर्कात आहेत. नुकतीच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी भास्कर जाधव शिवसेनेत गेल्यास कोंकणात राणेंना सह देण्यासाठी शिवसेनेला सोपे जाईल असे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here