हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार अजून अद्याप तरी या सरकारने गुण्यागोविंदाने कारभार केला आहे. भाजप कडून सातत्याने सरकार पडण्याचे दावे होत असताना तिन्ही पक्ष मात्र एकमेकांना साथ देताना देत आहेत. मात्र निधी मिळवण्यामध्ये शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद असूनही राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री असतानाही शिवसेनेला अधिक निधी मिळाला नाही. तर काँग्रेस दुसऱ्या स्थानी आहे.
एका आकडेवारीनुसार शिवसेनेच्या 56 आमदारांना एकूण 55, 255 कोटी निधी विकासकामांसाठी मिळाला आहे. तर राष्ट्रवादीचे एकूण 53 आमदार असून राष्ट्रवादी सत्तेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. पण निधी मिळवण्यात राष्ट्रवादीने बाजी मिळवली आहे. राष्ट्रवादीला 2 लाख 24 हजार 411 कोटींचा निधी मिळवला आहे. 2020 -2021मधील हे आकडे आहेत.
सत्तेत तिसऱ्या स्थानी असलेल्या काँग्रेसने निधी मिळवण्यात मात्र दुसरा क्रमांक पटकावला आहे. काँग्रेसला एकूण एक लाख 24 कोटी रुपयांचा निधी मिळाला असून त्यांनी शिवसेनेला मागे टाकले. मागील वर्षी निधी वाटपावरून काँग्रेस आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेसला भरपूर निधी मिळाल्याचे दिसत आहे.