शरद पवारांची बदनामी करण्यासाठी भाजपने पडळकरांना आमदारकी दिली; मुश्रीफांनी फटकारले

0
89
musriff padalkar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शरद पवारांची बदनामी करण्यासाठी भाजपने पडळकरांना आमदारकी दिली असून गोपीचंद पडळकर याना गांभीर्याने घेण्याची गरज नाही अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना फटकारले आहे. शरद पवारांमुळेच आरक्षण मिळालं नाही असा आरोप पडळकरांनी केला होता.

यावर प्रत्युत्तर देताना हसन मुश्रीफ म्हणाले, पवारसाहेब मुख्यमंत्री नाहीत आणि पंतप्रधानही नाहीत, त्यांच्यामुळे आरक्षण गेलं असं मूर्खपणाचं वक्तव्य भाजपचे लोक करत आहेत. शरद पवारांबद्दल बोलून स्वतःचं हस करून घेत आहेत”. खरं तर आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा आरक्षण दिलं. पण 102 वी घटना दुरुस्ती झाली आणि राज्याचे अधिकार आरक्षण संदर्भात काढून घेतले असेही हसन मुश्रीफ यांनी म्हंटल।

फडणवीस साहेबांनी जेव्हा निर्णय घेतला होता तेव्हाच आयोग नेमण्याची गरज होती, पण पाच वर्ष त्यांनी अशीच घालवली आणि त्याचे परिणाम आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात समोर आले आहेत. त्याचे गंभीर परिणाम असे झाले की देशातील ओबीसी आणि एन टी आरक्षण गेलं, असं मुश्रीफ म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here