Thursday, March 30, 2023

सत्ता गेल्यानंतर कुणाचा तोल जातो तर, कुणी भ्रमिष्ट होतं; जयंत पाटलांचा चंद्रकांतदादांना टोला

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. यानंतर अनावधानाने माझी जीभ घसरली अस म्हणत चंद्रकांत पाटील यांनी सारवासारव केली. मात्र जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला.

पुणे येथील एका कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील म्हणाले, सत्ता गेल्यानंतर कुणाचा तोल जातो तर, कुणी भ्रमिष्ट होतं, यापैकी चंद्रकांत पाटलांचं नेमकं काय झालंय?, याचं संशोधन करावं लागेल’, अशी खरमरीत टीका जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांवर केली आहे.

- Advertisement -

शरद पवारांबद्दल मनात आदरच – पाटील

शरद पवार यांच्याबद्दल माझ्या मनात आदरच आहे. त्यामुळे त्यांचा एकेरी उल्लेख करण्याचा प्रश्नच नाही. एका कार्यक्रमात अनावधानाने तो उल्लेख झाला, असं सांगतानाच त्या दिवशी एका क्षणापूरती माझी जीभ घसरली होती, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कबूल केलं