Monday, February 6, 2023

दोन तालुक्यात संवाद साधता न आल्याने पराभव ; जयंत पाटलांची प्रतिक्रिया

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस साठी अंत्यत प्रतिष्ठेची असलेल्या पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारत महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला. भाजपच्या समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा 3733 मतांनी पराभव केला. या पराभवा बद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी चांगली मदत केली. मात्र, दोन तालुक्यात संवाद साधता न आल्याने आमचा पराभव झाला असे जयंत पाटील यांनी सांगितले. दोन तालुक्‍यातील सर्वांना सोबत घेऊन जाण्यात आम्हाला अपयश आल्याने आमचा त्या ठिकाणी थोडक्यात पराभव झाला. या निवडणुकीसाठी अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती. पण तरीही आम्ही अपयशी ठरलो असे जयंत पाटील यांनी म्हंटल.

- Advertisement -

दरम्यान, पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजप उमेदवर समाधान आवताडे हे 3733 मतांनी विजयी झाले. त्यांच्या या विजयामुळे भाजपमध्ये चैतन्य निर्माण झाले असून यापुढेसुद्धा भाजप अशाच प्रकारे महाविकास आघाडीशी दोन हात करेल, असे भाजप नेत्यांकडून सांगितले जात आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.