महाराष्ट्राचा छळ कशासाठी?? ; रेमडेसिविर वरून जितेंद्र आव्हाड यांचा केंद्राला संतप्त सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ऑक्सिजन, बेडची व्यवस्था आणि रेमडेसिवीर च्या तुटवड्या वरून केंद्र आणि राज्य सरकार मध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान केंद्र सरकारने नुकतंच राज्यांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या वाटपासंबंधीची माहिती जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्राला दिवसाला २६ हजार रेमडेसिविर देण्यात येणार असल्याचा उल्लेख आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांनी मोदी सरकार वर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचा छळ कशासाठी?? असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हंटल की, महाराष्ट्रामधील रेमडेसिव्हीरची मागणी 50000 ची आहे, मोठ्या मुश्किलीने राज्य सरकार 33000 ते 36000 पुरवते आहे. आता केंद्र सरकारने ताब्यात घेतले त्यामुळे आता महाराष्ट्राला मिळणार 26000. महाराष्ट्राचा असा छळ कशासाठी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्राला दिवसाला 50 हजार इंजेक्शन लागतात, राज्य सरकारने तशी मागणीही केली आहे. पण केंद्र सरकार आता केवळ 26 हजार इंजेक्शन दिले आहेत असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. राज्याला दिवसाला ५० हजार रेमडेसिविर दिले जावेत अशी मागणी केली आहे. अन्यथा राज्यात मोठं संकट निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment