मुंबई । राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापनदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तसेच शिवसेना नेते, मंत्रिमंडळातील सहकारी, शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसेना कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचंही स्मरण करुन उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना वंदन केलं आहे.
शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, ”महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत शिवसेनेचं महत्वाचं योगदान आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक प्रमुख पक्ष आज महाविकास आघाडीत आमच्यासोबत आहे, याचा आनंद आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शिवसेनेसोबत काम करत असताना येणारे अनुभव सुखावणारे आहेत. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वाखाली शिवसेना भविष्यात अधिक यश मिळवेल, महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देत राहील, असा विश्वास वाटतो. वर्धापनदिनाच्या सर्व शिवसैनिकांना मनापासून शुभेच्छा, ”असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या ५४व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तसंच शिवसेना नेते, मंत्रिमंडळ सहकारी,पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शुभेच्छा!शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना वंदन!@OfficeofUT
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 19, 2020
दरम्यान, राज्यात तब्बल २५ वर्षांनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे आणि खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या पदावर विराजमान असले तरी कोरोना संकटामुळे यावर्षी शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा जल्लोष नसेल. शिवसेना शाखेत आधी पासूनच रुग्णांची तपासणी करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. तसंच इतर गरजूंनाही मदतीचं सत्र सुरुच ठेवण्याचं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”