विधानसभा निवडणूक २०१९ : पुण्यातील आठ जागांची काँग्रेस राष्ट्रवादीत अशी झाली वाटणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुण्याचे जागांचे वाटप जाहीर केले आहे. पुण्यात कोणत्या मतदारसंघात राष्ट्रवादी आणि कोणत्या मतदारसंघात काँग्रेस लढणार हे यावरून स्पष्ट झाले आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांसमोर निवडणूक जिंकण्याचे मोठे आव्हान असून गतवेळी पुण्याच्या आठी जागी जिंकलेल्या भाजपला पराभूत करणे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला शक्य नसणार आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पक्षीय ताकद चांगली असणाऱ्या मतदारसंघातच आपले उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे.

हडपसर, पर्वती, खडकवासला, वडगावशेरी या मतदारसंघात राष्ट्रवादी आपले उमेदवार उभा करणार आहे. त्याच प्रमाणे शिवाजीनगर, कसबा, कॅन्टोन्मेंट या मतदारसंघात काँग्रेस आपले उमेदवार उभा करणार आहे. तर कोथरूड विधानसभा मतदारसंघ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मित्र पक्षाला लढण्यासाठी सोडणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले आहे.