हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री कंगना राणावत हिने नुकतेच एक वादग्रस्त विधान केले. त्यामुळे तिच्यावर टीका होऊ लागली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कंगना राणावत हिच्यावर निशाणा साधला आहे. “2014 नंतर देशाला काय मिळालं? पेट्रोल महंगा… गॅस महंगा…. ज्यांना देशाचा इतिहास माहित नाही. त्यांना पुरस्कार दिला जातो,” असा टोला भुजबळांनी लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज इगतपुरी तालुक्यातील सोनोशी येथे एक कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. यावेळी मंत्री भुजबळ म्हणाले की, काही लोक म्हणतात 1947 ला मिळालेले स्वतंत्र म्हणजे भीक आहे. असे म्हणत आहे. मात्र, त्यांनाही सांगावे कि 2014 नंतर काय मिळालं? पेट्रोल महंगा… गॅस महंगा…. ज्यांना देशाचा इतिहासच माहिती नाही. त्यांना मोठ-मोठे पुरस्कार दिले जात आहेत, असा टोला भुजबळांनी लगावला.
1947 साली देशाला मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक होती, खर स्वातंत्र्य तर 2014 ला मिळालं, असे वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावत हिने केले आहे. तिच्या या वक्तव्यावरून आता महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून तिच्यावर टीका केली जाऊ लागली आहे.