म्हाडाच्या परीक्षेबाबत जितेंद्र आव्हाड यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा; म्हणाले कि…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । म्हाडाच्या विविध पदांसाठी रविवारी परिक्षा घेण्यात येणार होती. मात्र, पेपर फुटण्याची शक्यता असल्याची माहिती म्हाडाला मिळाल्याने आदल्यादिवशी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान, या प्रकरणी आता मंत्री आव्हाड यांनी मोठी घोषणा केली आहे. खासगी संस्थांकडून परीक्षा घेण्यात येत असल्याने गोपनीयतेचा भंग होण्याचे प्रकार होऊ नये म्हणून या पुढे म्हाडाच सर्व परीक्षा घेणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचे आता घेतलेले शुल्क परत करण्यात येईल. आणि पुढील परीक्षेसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नसल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज म्हाडाच्या विविध पदांसाठी परिक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांना हॉल तिकीटही देण्यात आली होती. मात्र, पेपर फुटण्याची शक्यता असल्याची माहिती म्हाडाला मिळाली. आणि म्हाडाने हि माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून संशयितांना ताब्यात घेतले आहे.

याबाबात अधिक तपास केल्यानंतर हि गोष्ट निदर्शनास आली की प्रश्नपत्रिकेबाबत एकाच व्यक्तीला माहिती होती. प्रश्नपत्रिका छपाईला गेल्यावर संबंधित कंपनीने त्या प्रश्नपत्रिका आपल्या ताब्यात ठेऊ नयेत, असे स्पष्ट नियम असतानाही या कंपनीच्या मालकाने सदर प्रश्नपत्रिका आपल्या ताब्यात ठेवली. त्याने गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या परिक्षेत काहीतरी गैरप्रकार होणार असल्याचा संशय यापूर्वीच आला होता. त्यामुळेच आपण तीन दिवसांपूर्वीच गैरप्रकार आढळल्यास परीक्षा रद्द करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आपण परीक्षा रद्द केली, असे आव्हाड यांनी सांगितले.

Leave a Comment