आघाडीच्या नेत्यांवरील कारवाईसाठी भाजप नेत्यांकडून एकत्र रणनीती; रोहित पवारांचा गौप्यस्फोट

0
76
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांना ईडी, एलसीबीच्या माध्यमातून टार्गेट केले जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर ईडी व सीबीआयच्या माध्यमातून काय कारवाई करता येईल, याबाबत रणनीती आखण्यासाठी भाजपच्या नेत्यांची एक मोठी बैठक घेण्यात आली होती. त्यात रणनीती आखलयानंतर मंत्र्यांवर ईडी व सीबीआयच्या कारवायांचे सत्र सुरूकरण्यात आल्याचा गौप्यस्फोट पवार यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याकडून आज जळगाव जिल्ह्याचा दौरा केला जात आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाला भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर आज जे कारवाईचे सत्र सुरु आहे. त्यामागे भाजपचाच हात आहे. कारण सहा ते सात महिन्यांपूर्वी भाजपच्या नेत्यांची एक मोठी बैठक झाली होती. त्यात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर ईडी व सीबीआयच्या माध्यमातून काय कारवाई करता येईल, याबाबत रणनीती आखण्यात आली. तसे पत्रही भाजप नेत्यांनी केंद्र सरकारला दिले. त्यानंतर मंत्र्यांवर ईडी व सीबीआयच्या कारवायांचे सत्र सुरू करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे ईडी व सीबीआयच्या माध्यमातून केल्या जात असलेल्या कारवाई बाबत राज्य सरकारकडून केंद्रात विचारणाही करण्यात येत आहे. मात्र, केंद्र सरकारकडून राज्य सरकारचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, हे आता चालू देणार नाही. कोणत्याही परिसस्थिती आम्ही या विरोधात आवाज उठवणारच आहोत, असेही रोहित पवार यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here