हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत इशारा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून ठाकरेंवर निशाणा साधला जाऊ लागला आहे. नुकतेच रुग्णालयातून बरे होऊन घरी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे याच्यावर निशाणा साधला आहे. भाजपच्या बोलक्या भवल्याचं खेळ सुरु असून यात एक अर्धवटराव आहेत. हे अर्धवटराव अगोदर भाजप विरोधात बोलायचे. लाव रे तो व्हिडीओ असे म्हणायचे. मात्र, आता ईडीच्या ससेमीरामुळे ते गप्प बसले आहेत, अशी टीका मुंडे यांनी केली आहे.
धनंजय मुंडे यांनी सांगलीच्या इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी परीसंवाद यात्रेच्या जाहीर सभेला नुकतीच हजेरी लावली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मुंडे म्हणाले की, राज ठाकरे हे सध्या भाजपचे भोंगे म्हणून काम करत आहेत. भाजपकडून तसेच कोणी काहीही बोलले तरी राज्यात पक्षाचा एक दिवस मुख्यमंत्री होणार आहे. राष्ट्रवादीचे 100 हून आमदार येतील.
धनंजय मुंडे यांनी इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी परीसंवाद यात्रेच्या सभेत राज ठाकरे यांच्यावर टीका करताना सूचक असे एक वक्तव्यही केले आहे. त्यांनी राष्ट्रवादीचा एक दिवस मुख्यमंत्री होणार असे म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.