बीड । शरद पवारांवर टीका करत असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा तोल घसरला आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, अशी अत्यंत खालच्या पातळीची टीका पडळकर यांनी केली आहे. पडळकर यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. पडळकर यांच्याविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे फायर ब्रॅड नेते धनंजय मुंडे यांनी पडळकर यांच्या वक्तव्यावरुन निशाणा त्यांच्यावर साधला आहे. नेम आणि फेम मिळवण्यासाठी शरद पवारांवर टीका केली जाते. बिरोबा यांना सुबुद्धी देवो, असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
धनंजय मुंडे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले कि, ”राजकारणात नेम आणि फेम मिळवायचे असले की शरद पवार साहेबांवर टीका करायची हे समजून अनेकजण उचलली जीभ लावली टाळ्याला या उचापती करतात. सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न न करता डिपॉझिट, अस्तित्व टिकून राहील, देवांच्या खोट्या शपथा घ्याव्या लागणार नाही, हे पहावे. बिरोबा यांना सद्बुद्धी देवो!”
राजकारणात नेम आणि फेम मिळवायचे असले की @PawarSpeaks साहेबांवर टीका करायची हे समजून अनेकजण उचलली जीभ लावली टाळ्याला या उचापती करतात. सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न न करता डिपॉझिट, अस्तित्व टिकून राहील, देवांच्या खोट्या शपथा घ्याव्या लागणार नाही, हे पहावे. बिरोबा यांना सद्बुद्धी देवो!
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 24, 2020
दरम्यान, गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याच्या तीव्र प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटतील, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. तसंच ही भाजपची संस्कृती आहे का? देवेंद्र फडणवीसांनी याचं उत्तर द्यावं, असंही आव्हाड म्हणाले आहेत. तर ‘विधानसभेवेळी पडळकरांसारखा व्हायरस बाजूला ठेवला, याबाबत बारामतीकरांचे आभार. तुमचं जेवढं वय नाही तेवढा काळ शरद पवार राजकारणात आहेत. पडळकर यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे, त्यांनी भाजपची असभ्य संस्कृती खूप लवकर आत्मसात केली, ‘ अशी टीका रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”