नाथाभाऊंनी दिल्या हाडवैरी सुरेशदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा; गिरीश महाजनांना शह देण्यासाठी येणार एकत्र?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव । नुकतेच भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे हळूहळू महाविकास आघाडीत स्थिरावत असल्याचं चित्र आहे. त्याची प्रचिती सोशल मीडियावर येत आहे. एकनाथ खडसे यांनी त्यांचे एकेकाळचे कट्टर विरोधक आणि हाडवैरी असलेले शिवसेना नेते आणि माजी मंत्री सुरेशदादा जैन (Suresh Jain) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कारण गेली दोन दशकं जळगावकरांनी खडसे विरुद्ध सुरेशदादा जैन असाच सामना पाहिला आहे. त्यामुळं खडसेंनी सुरेशदादांना शुभेच्छा देणं हे जळगावकरांसाठी आश्चर्यकारक अशीच घटना आहे.

सुरेशदादा जैन यांचा काल वाढदिवस होता. त्यानिमित्त एकनाथ खडसे यांनी ट्विट केलं. “शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री श्री. सुरेशदादा जैन यांचे वाढदिवसाबद्दल हार्दिक अभीष्टचिंतन!” असं खडसे म्हणाले. खरंतर वाढदिवसाला शुभेच्छा देणं यावरुन कोणते राजकीय अर्थ काढण्यात तथ्य नाही. पण जळगावकरांसाठी ही घडामोड आश्चर्यकारकच होती. खडसे भाजपमध्ये असताना सुरेश जैन हे त्यांचे कट्टर विरोधक होते. मात्र खडसे राष्ट्रवादी जाताच खडसे यांनी सुरेश जैन यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिल्यांदाच शुभेच्छा दिल्या. त्यामुळे जिल्ह्यात राजकीय लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Mahavikas Aaghadi)

खडसेंचे मिशन गिरीश महाजन?
जळगाव जिल्ह्यात (jalgaon politics)आता नवीन समीकरण खडसे तयार करतात की काय अशी चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे. खडसे आणि जैन हे राजकारणातील कट्टर विरोधक मानले जातात. मात्र उत्तर महाराष्ट्रात भाजपाला नेस्तनाबूत करण्यासाठी खडसे सर्व शक्ती एकवटत आहेत का असा या निमित्ताने प्रश्न आहे. जळगावात खडसे आणि जैन यांचं वैर जर मैत्रीत बदललं तर भाजपच्या गडाला सुरुंग लावणं खडसेंना मदतीचं ठरणार आहे. विशेषत: देवेंद्र फडणवीसांच्या काळात, भाजपने गिरीश महाजन यांना दिलेली ताकद पाहता, खडसेंचं ‘मिशन महाजन’ सुरु झालंय की काय, असा प्रश्न आहे. (Eknath Khadses birthday wishesh to Suresh Jain)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’