अमिताभ बच्चन काही देशाचे आदर्श नाहीत; कॅनेडीयन ‘कुमार’ला देशाबाबत बोलायचा अधिकार नाही- आव्हाड

मुंबई । काँग्रेस नेते नाना पटोले यांनी बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना फटकारल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. देशातील प्रश्नावर बोलण्याचा अक्षय कुमारला बोलण्याचा अधिकार नाही. तो कॅनडाचा नागरिक आहे. तर अमिताभ बच्चन काही देशाचा आदर्श नाहीत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या दोन्ही अभिनेत्यावंर निशाणा साधला आहे.

देशातील चित्रपट सृष्टीमध्ये सगळ्यात जास्त पैसा अक्षयकुमार कमावतो. तो परदेशी नागरिक आहे. अमिताभ बच्चन देशाचा आदर्श नाहीत. अक्षय कुमार देश चालवत नाही. अमिताभ बच्चन यांना मेमरी लॉस झाला आहे का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारलाय. या लोकांनी राजकारणात हात घालायला नको, असं मतही आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे. त्यांची राजकीय कोंडी झाली आहे. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना लाचारी करावी लागते हे दुर्दैवं असल्याचंही आव्हाड यांनी म्हटलंय.

दरम्यान, नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचा चित्रपट महाराष्ट्रात चालू देणार नाही, असा इशारा दिला आहे. मनमोहन सरकारच्या काळात सिने अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र आता त्यांनाही विसर पडल्याने भविष्यात काँग्रेस अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे चित्रिकरण महाराष्ट्रात होऊ देणार नाही तसेच त्यांचे सिनेमे प्रदर्शितही होऊ देणार नाही, असा सक्त इशारा नाना पटोले यांनी दिला.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.