हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिवंगत अभिनेता सुशांत सिंग रजपूतच्या आत्महत्येला आज 1 वर्ष पूर्ण झाले. सुशांतच्या आत्महत्या नंतर राज्यात राजकीय वातावरण गरम झालं होतं तसेच काही लोकांनी सरकार वर निशाणा साधला होता. परंतु सीबीआय, एनसीबी ने अनेक प्रकारचे तपास करून देखील सुशांतचा मृत्यू ही हत्या होती की आत्महत्या हे अजून समजलं नाही. त्यावरून राष्ट्रवादीने भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.
सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येच्या नावावर भाजपला बिहार निवडणूक लढवायची होती. त्यामुळे सीबीआयला पुढे करून महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचण्यात आले होते, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
सुशांतसिंहच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करत असतानाच राजकीय कारणामुळे या प्रकरणाचा गुन्हा बिहार सरकारने दाखल केला. त्यानंतर ही केस सीबीआयकडे दिली होती. परंतु, निष्पन्न काय झालं?, असा सवालही मलिक यांनी केला आहे. एक वर्षानंतर सुशांतसिंहच्या आत्महत्येचा तपास झालेला नाही. त्यामुळे त्याची आत्महत्या नव्हती तर त्याचा हत्यारा कोण हे सीबीआयने जनतेला सांगितले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.