रणजितसिंह निंबाळकर मिक्सर दुरुस्तीचा डिप्लोमा केलेले भाजपमधील एकमेव खासदार; रामराजेंची टीका

0
187
RamrajeNaik Nimbalkar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

संसदेत असलेल्या 542 खासदारांपैकी रणजितसिंह निंबाळकर हे एकमेव खासदार आहे ज्यांनी हाऊस अप्लायंसेस मेंटेनंन्स डिप्लोमा केला आहे. हा डिप्लोमा मिक्सर टोस्टर मेंटेनंन्समधील आहे. अशा खासदाराला साधा हिदुत्व हा शब्द तरी लिहायला येईल का? असा सवाल करत माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर टिका केली.

फलटण तालुक्यातील गोखळी येथे कापूस उत्पादकांचा शेतकरी मेळावा नुकताच पार पडला. यावेळी रामराजेंनी भाजपा खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला.

येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर फलटणमधील राजकारण चांगलच तापल्याचे पहायला मिळत आहे. येत्या काही दिवसात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यापूर्वी रामराजेंनी खासदार रणजितसिह निंबाळकर यांच्यावर केलेल्या टीकेची चांगलीच चर्चा सध्या सातारा जिल्ह्यात रंगली आहे.