राज्यपालांच्या राजीनामा मंजुरीवर पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की, अशी व्यक्ती…..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्र्रपतींनी मंजूर केल्यांनतर राज्यातील महाविकास आघाडी कडून या निर्णयाचे स्वागत केलं जात आहे. कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यांनतर महाराष्ट्राची सुटका झाली अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, माझ्या मते महाराष्ट्राची सुटका झाली, अतिशय चांगला निर्णय आहे हा… खरं तर यापूर्वीच हा निर्णय घ्यायला हवा होता. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी व्यक्ती कधीही राज्यपाल झाली नव्हती. मात्र आता केंद्र सरकारने आणि राष्ट्रपतींनी हा बदल केला ही समाधानाची बाब आहे असं पवारांनी म्हंटल. तसेच त्यांच्या कडून जे जे काही संविधानाच्या विरुद्ध झालं असेल त्याची चौकशी झाली पाहिजे असेही त्यांनी म्हंटल.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा राज्यपालांचा राजीनामा मंजूर झाल्यांनतर ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उशीरा का होईना महाराष्ट्र द्वेष्ट्याकडून राज्याची सुटका! महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती झालेले रमेश बैस यांचं अभिनंदन! ते संविधानाचा मान ठेवतील आणि राज्याची अस्मिता जपण्यासोबतच महान व्यक्तींचा अनादर न करता सन्मान राखतील, अशी अपेक्षा! त्यासाठी त्यांना शुभेच्छा! असं रोहित पवार यांनी म्हंटल.