हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी देशातील आणि राज्यातील भाजपाच्या नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्याचा सपाटाच लावला आहे. हे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून भाजपाचे प्रवक्ता आणि आमदार यांचा समावेश आहे. यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबेर (Rupali Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
काय म्हणाल्या रुपाली पाटील-ठोंबेर?
भाजपाने महाविकास आघाडी सत्तेत असताना शिंदे गटाला विकास की सत्तेसाठी फोडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आम्हाला सांगावे गुवाहाटीला कशासाठी गेला होता. कोणते विकासाचे राजकारण मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं. आपण हिंदुधर्मासाठी गेला मग राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वक्तव्य केलं, तेव्हा आळीमिळी गुपचिळी करून बसला, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबेर (Rupali Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली आहे.
मनसेवरदेखील साधला निशाणा
“भाजपाचे भा** प्रत्येक क्षेत्र बदनाम करत आहेत, तरीही मुख्यमंत्री शिंदे शांत बसले. मुख्यमंत्री आणि शिंदे गटातील आमदार स्वत:वर ईडी आणि सीबीआयची कारवाई होऊ नये, म्हणून भाजपाबरोबर गेले आहेत. हे सर्व जगजाहीर झाले आहे. तसेच त्यांनी (Rupali Patil) मनसेची परिस्थिती अशी झाली की काय सोडायचं आणि काय धरायचं,” असा खोचक टोला मनसेला लगावला आहे.
हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या