Tuesday, January 31, 2023

राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांना पडळकर समर्थकाकडून धमकीचा फोन

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने पवार कुटुंबियांवर टीका करत असून त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी चोख शब्दांत खडेबोल सुनावल्यानंतर आता पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून सक्षणा सलगर यांना धमकी देण्यात आली असून स्वतः सक्षणा यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

मला आज सायंकाळी 06:14 वा. 9922300038 या नंबरवरुन फोनवरुन कॉल आला होता. ही व्यक्ती माझी इज्जत लुटण्याची भाषा करत होती. आ. गोपीचंद पडळकर यांचा तो कार्यकर्ता आहे असे तो सांगत होता.” असं ट्वीट सलगर यांनी केलं आहे.

- Advertisement -

दरम्यान सक्षणा यांना धमकीचा फोन आल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पक्षभेद न बघता लेखी तक्रार दे मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हंटल. सक्षणा, तो कोणीही असो त्याला शिक्षा ही व्हायलाचं हवी. अशा पद्धतीत कुणीही महिला/मुलीला धमकावू शकत नाही आणि जो हे करेल त्याला आम्ही सोडणार नाही. हा राजकीय नाही तर आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यासाठी एकत्रित येऊन विकृतांना ठेचू”, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी सक्षणा यांना पाठिंबा दिला.