माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबन शिंदेंनी बोलावली कार्यकर्त्यांची बैठक ; सुरु आहे भाजपमध्ये जाण्याची तयारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे माढा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे सध्या पराभवाच्या भीतीने धास्तावले असून त्यांनी भाजपमध्ये जाण्याची तयारी केली आहे. यासाठी आज त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. टेंभुर्णी जवळील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर हि बैठक बोलायावण्यात आली असून या बैठकीत बबन शिंदे नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीने पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी ५० लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली. या निधीत बबन शिंदे यांनी आपली रक्कम जमा नकरता स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून १० लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीमध्ये जमा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी भाजप प्रवेशाच्या वाटाघाटी देखील केल्या असे बोलले जाते आहे. त्यामुळे येत्या काळात ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीला देखील बबन शिंदे यांच्या भाजप प्रवेशाची कुणकुण आधीच लागल्याने शिंद्यांचे कट्टर विरोधक शिवाजीराव कांबळे यांना बळ देण्यासाठी राष्ट्रवादीने तयारी सुरु केली आहे. शिवाजीराव कांबळे यांनी मतदारसंघात गावभेटी घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शिंदे भाजपमध्ये गेल्यास त्यांच्या विरोधात शिवाजी कांबळे उभा राहण्याची शक्यता आहे.

बबन शिंदे हे १९९५ पासून आज तागायत विधानसभेचे सदस्य आहेत. १९९५ साली अपक्ष तर १९९९ साली राष्ट्रवादीच्या स्थापने पासून आज तागायत राष्ट्रवादीचे आमदार म्हणून त्यांनी विधानसभेत काम केले आहे. तब्बेतीच्या कारणाने बबन शिंदे यावेळी विधानसभा लढणार नाहीत. तर ते आपल्या मुलाला रणजित शिंदे यांना मैदानात उतरवणार असल्याचे बोलले जाते आहे. माझ्या डोळ्या देखत माझ्या मुलाला एकदा आमदार करा असे भावनिक आवाहन देखील ते मतदार आणि कार्यकर्त्यांना करत आहेत. अशा सर्व पार्श्वभूमीवर बबन शिंदे यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.