हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या काही दिवसांपासून महागाईचा भडका उडालेला आहे. पेट्रोल- डीझेल आणि गॅस सिलेंडर च्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे.त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केंद्र सरकार वर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तुम्ही सांगितलेले कुठे आहेत अच्छे दिन असा थेट सवाल महेश तपासे यांनी केला आहे.
मोदीजी कुठे आहेत अच्छे दिन? @PMOIndia@NCPspeaks @PetroleumMin @abpmajhatv @zee24taasnews @TV9Marathi @JaiMaharashtraN @saamTVnews @News18lokmat#PetrolDieselPriceHike #lpgpricehike #TheKashmirFiles #BudgetSession2022 pic.twitter.com/1GlRECDOsA
— Mahesh Bharet Tapase महेश भारत तपासे (@maheshtapase) March 26, 2022
5 दिवसात 3 वेळा पेट्रोल- डिझेलची दरवाढ झाली. घरगुती गॅस सिलेंडर 50 रुपयांनी वाढला. कुठे चाललंय मोदी सरकार. अच्छे दिनाचा वादा करणारे मोदी सरकारने जनतेला आर्थिक घाईत ढकलले आहे. कोणत्याही प्रकारचा आर्थिक बोजा स्वीकारायला केंद्र सरकार तयार नाही असा आरोप महेश तपासे यानी केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देशातल्या अर्थसंकल्पावर चर्चा होणे अपेक्षित आहे, परंतु काश्मिर फाईल्स सारख्या विषयाची जेव्हा अर्थमंत्री चर्चा करतात तेव्हा या सरकारचे लक्ष नेमके कुठे आहे हे आपल्याला दिसून येते.@nsitharaman @FinMinIndia
— Mahesh Bharet Tapase महेश भारत तपासे (@maheshtapase) March 26, 2022
अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देशातल्या अर्थसंकल्पावर चर्चा होणे अपेक्षित आहे. परंतु काश्मिर फाईल सारख्या विषयाची जेव्हा अर्थमंत्री चर्चा करतात तेव्हा या सरकारचे लक्ष नेमके कुठे आहे, हे आपल्याला दिसून येते. महागाईने आठ महिन्यांचा उच्चांक गाठलेला असताना देखील मोदी सरकार कुठल्याच प्रकारे नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील नाही. ही वस्तुस्थिती आज जनतेपासून लपलेली नाही, अशी टीकाही महेश तपासे यांनी केली.