आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो; भुजबळांचा चिमटा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत शेतकरी आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना आंदोलनजीवी म्हटलं होतं. त्यावर देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यातही पंतप्रधान मोदींच्या विधानावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी टीका केली आहे. प्रत्येक बारीक-सारीक गोष्टींवर भाजप आजसुद्धा आंदोलन करत आहे त्यामुळे आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. मुंबईत पक्ष कार्यालयातील जनता दरबारानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आंदोलने ही जगभर होत आहेत. या देशाला ही आंदोलने नवीन नाहीत. भाजप सत्तेत नव्हती त्यावेळी रोज काही ना काही आंदोलन असायचं. कुठे बांगड्या घेऊन जा, कुठे रिकामे हंडे घेऊन जा, रस्त्यातच बस, वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलने केली. सभागृहात त्यांनी आंदोलने केली याची आठवणही छगन भुजबळ यांनी यावेळी करून दिली. आपल्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्यांना आंदोलनजीवी अशा पध्दतीने हिणवणं योग्य नाही असं भुजबळ यांनी म्हटलं.

लोकशाहीमध्ये एखादा मुद्दा किंवा सरकारने घेतलेला निर्णय मान्य नसेल तर पत्र पाठवायचं, निषेध व्यक्त करायचा, आंदोलन करायचे असते. मग याव्यतिरिक्त आणखी दुसरं काय करायचं असा सवालही त्यांनी केला. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचा आज राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपला. त्यांच्या निरोपाच्या भाषणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी गहिवरून गेले होते. त्यावरूनही भुजबळांनी मोदींवर टीका केली आहे. आज कुणीतरी मला व्हॉटस्ॲपवर पाठवलं आहे की, मोदी गहिवरलेसुध्दा त्यामुळे नक्की हे खरे की ते खरे हे मोदींनाच विचारायला हवे खरे मोदी कोण?, असा सवालही त्यांनी केला.

मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment