अजित पवारांचे मंत्री शरद पवारांच्या भेटीला; मोठं काय घडतंय?

Sharad Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३५ पेक्षा जास्त आमदारांनी शिंदे- फडणवीस यांच्या सरकार मध्ये सहभाग घेतल्यानंतर आज प्रथमच राष्ट्रवादीचे सर्व मंत्री पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी वायबी चव्हाण सेंटरवर गेले आहेत. या घटनेने पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून राष्ट्रवादीच्या गोटात वेगळंच काही घडत तर नाही ना अशा चर्चा सुरु आहे.

उद्यापासून राज्याचे पावसाळी आदिवेश सुरु होणार आहे. त्यापूर्वीच अजित पवार यांच्यासोबतचचे मंत्री शरद पवारांच्या भेटीला गेल्याने भुवया उंचावल्या आहेत. अजित पवार यांच्यासोबत, छगन भुजबळ, अदिती तटकरे, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, हे मंत्री यशवंतराव चव्हाण सेंटरवर पोहचले असल्याची माहिती मिळत आहे. तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे सुद्धा यावेळी उपस्थित आहेत.

आज सकाळी अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी त्यांच्या गटाची बैठक पार पडली, त्यानंतरच हे नेते शरद पवारांच्या भेटीसाठी गेले. महत्वाचे म्हणजे हे सर्व मंत्री वायबी चव्हाण सेंटरवर पोचल्यानंतर शरद पवार यांचे विश्वासू जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे सुद्धा तातडीने वायबी चव्हाण सेंटरवर गेले. तब्बल अर्धा तास अजित पवारांच्या मंत्र्यांनी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये वेगळं काहीतरी घडतंय का हे पाहावं लागेल