हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ राज्यात काढण्यात आलेल्या मोर्चांमध्ये झालेल्या हिंसाचारावरून भाजपावर महाविकास आघाडी सरकामधील नेत्यांनी निशाणा साधला होता. भाजपकडून हिंदू-मुस्लीम भांडणं लावली जात असल्याचा आरोप केला गेला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्रात हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करू पाहणाऱ्या भाजपच्या नेत्यांना वामनदादादांच्या व्हिडिओतील गीताद्वारे सणसणीत टोला लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत वामनदादा या नावाचे कलाकार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील गीत म्हंटले आहे. त्या गीतातून महाराष्ट्रात हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करू पाहणाऱ्या भाजपच्या नेत्यांना सणसणीत उत्तर दिले असल्याचे मिटकरी यांनी म्हंटले आहे.
महाराष्ट्रात हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करू पाहणाऱ्या भाजपच्या नेत्यांना वामनदादाच्या या गीताद्वारे सणसणीत उत्तर देणाऱ्या या कलावंतास मुजरा…#shameBjp pic.twitter.com/KuGfU1QWBM
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 2, 2021
अमरावती या ठिकाणी घडलेल्या घटनेनंतर भाजपकडून राज्यात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका महाविकास आघाडी सरकामधील नेत्यांकडून केली जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्हिडीओ ट्विट करीत पुन्हा भाजपवर निशाणा साधला आहे.