मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते आणि लोकसभेचे खासदार सुनील तटकरे आणि त्यांचे पुतणे अवधूत तटकरे रे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. विधानसभा निववडणुकी पूर्वीच हे दोघेही शिवसेनेत दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर अवधूत तटकरे आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला जाणार असल्याचे देखील बोलले जाते आहे.
सुनील तटकरे राष्ट्रवादीला रामराम ठोकणार या बाबत मागील काही दिवसापासून चर्चा होत्या. त्या चर्चाना आता मूर्त रूप मिळणार असल्याचे बोलले जाते आहे. कारण अवधूत तटकरे उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. तसेच सुनील तटकरे शिवसेनेत गेल्यानंतर त्यांच्या लोकसभा सदस्यत्वाचे काय होणार हा देखील मुद्दा उपस्थित केला जात आहे. मात्र त्याबद्दल आद्याप कसलीच माहिती मिळू शकली नाही.
सुनील तटकरे यांना पवार कुटुंबाचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाते. तरी देखील ते शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा आहेत. त्याच प्रमाणे त्यांचे पुतणे अवधूत तटकरे हे देखील शिवसेनेत जाणार आहेत. अवधूत तटकरे यांचे बंधू संदीप तटकरे यांचे आपले चुलते सुनील तटकरे यांच्यासोबत वाद झाल्याने त्यांनी आधीच शिवसेनेत प्रवेश केला आहे.