हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. तसेच पवार कुटुंबियांना सध्या त्यांनी लक्ष केले आहे. नुकतेच सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांना समीर वानखेडे यांच्या केसालाही धक्का लागल्याचे विधान करीत इशारा दिला. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांनी सोमय्यांवर टीका केली. सोमय्या हे काय ईडीचे प्रवक्ते आहेत काय. ते ईडीचे प्रवक्ते असल्यासारखे बोलतात. असे पवार यांनी म्हंटले.
आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर सध्या ईडीकडून कारवाई केली जात आहे. एकीकडे ईडीकडून चौकशी केली जात आहे तर दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या हे ईडीचे प्रवक्ते असल्यासारखे बोलत आहेत. ते खरोखर ईडीचे प्रवक्ते आहेत काय? असा सवालही पवार यांनी यावेळी केला.
रोहित पवार यानी काल एका धक्कादायक माहितीही दिली होती. ती म्हणजे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर आज जे कारवाईचे सत्र सुरु आहे. त्यामागे भाजपचाच हात आहे. कारण सहा ते सात महिन्यांपूर्वी भाजपच्या नेत्यांची एक मोठी बैठक झाली होती. त्यात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर ईडी व सीबीआयच्या माध्यमातून काय कारवाई करता येईल, याबाबत रणनीती आखण्यात आली. तसे पत्रही भाजप नेत्यांनी केंद्र सरकारला दिले. त्यानंतर मंत्र्यांवर ईडी व सीबीआयच्या कारवायांचे सत्र सुरू करण्यात आले आहे.