…म्हणून भीतीपोटी सीबीआय चौकशीची मागणी; रोहित पवारांचा फडणवीसांना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | टीईटी पेपर फुटी प्रकरणात पुणे पोलिसांना दररोज नवनवीन पुरावे मिळत आहेत. अटक केलेल्या अधिकाऱ्यांकडून रक्कमही मिळत आहे.या दरम्यान भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे हे भाजपच्या मोठ्या नेत्यांपर्यंत जात आहे. त्या भीतीपोटी त्यांनी अशी मागणी केली असावी, असा टोला पवार यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज पुणे येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व आमदार गोपीचंद पडळकर यांना टोला लगावला. फडणवीसांना टोला लगावताना पवार म्हणाले की, सध्या पोलिसांकडून पेपर फुटी प्रकरणाचा तपास सुरू आहे. राज्य सरकार खोलात जाऊन या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. पण, भाजपने सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

भाजपच्याच काळात महापोर्टल घोटाळा झाला होता, तो घोटाळा उघडकीस आहेच पण आताही टीईटी घोटाळ्याचे सगळे धागेदोरे हे भाजपच्या मोठ्या नेत्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच कदाचित फडणवीस हे भीतीपोटी हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी करत असावेत. जेणेकरुन केंद्राचा चौकशीवर कंट्रोल यावर राहील, असा टोलाही रोहित पवारांनी फडणवीसांनी लगावला.

यावेळी रोहित पवार यांनी पडळकरांनाही टोला लगावला. यावेळी ते म्हणाले की, गोपीचंद पडळकर यांनी नोव्हेंबर महिन्यात आपल्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता असं सांगत एक व्हिडीओ प्रसिद्ध करून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.