आता तरी नुकसानीबाबत केंद्राने बघ्याची भूमिका घेऊ नये; रोहित पवारांचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतीचे नुकसान झाले आहे. गेल्यावर्षीही अतिवृष्टीमुळे राज्यात शेतीचे नुकसान झाले. मात्र अशा परिस्थिती केंद्र सरकारकडून भरीव स्वरूपात मदत देण्यात आली नाही. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी थत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करीत मराठवाड्यात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता तरी केंद्राने बघ्याची भूमिका घेऊ नये,” असे म्हंटले आहे.

आमदार रोहित पवार यांनी मराठ्वाढ्यातील नुकसानीवरून ट्विट करून केंद्र सरकारवर मिशांना साधला आहे. पवारांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “आधी कोकण, पश्चिम महाराष्ट्र नंतर मराठवाडा व विदर्भ आणि आज पुन्हा मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रअतिवृष्टीने शेतकऱ्याला पूर्णत: घायाळ केलंय. सोयाबीन, कापूस, ऊस या पिकांचं अतोनात झालेलं नुकसान हे न भरून निघणारं आहे. अगदी हातातोंडाशी आलेला घास या संकटाने हिरावलाय.

आर्थिक अडचण असतानाही राज्य सरकारने दोन महिन्यापूर्वी आपत्तीग्रस्तांना भरीव मदत दिली तशीच मदत आज मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला देईल, असा विश्वास आहे. केंद्र सरकारनेही किमान आता तरी बघ्याची भूमिका न घेता अन्नदात्याला मदत करण्यासाठी आपली जबाबदारी उचलावी.

बदलतं हवामान आणि वाढत्या आपत्ती बघता शेतीत शाश्वत उत्पन्न राहिलेलं नाही. शेतीसमोरील आव्हाने अतिशय किचकट होणार आहेत. त्यामुळं भविष्यात शाश्वत आणि परवडणाऱ्या शेतीसाठी नवीन धोरण आणि योग्य उपाययोजनाही वेळीच आखाव्या लागतील, हेही तेवढंच खरंय,” असेही रोहित पवार यांनी म्हंटले आहे.