हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंढरपूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी राष्ट्रवादीकडून कुणाला संधी मिळणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलीय. अशावेळी राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth pawar) पुन्हा एकदा निवडणुकीसाठी उभे राहण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे.
माजी आमदार औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी ही मागणी केली आहे. अमरजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना तसं पत्र लिहिलं आहे. पंढरपूर मतदारसंघात भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण व्हायला हवं. पार्थ पवार पंढरपूरमध्ये आले तर रखडलेला विकास लवकर होईल, त्यामुळे पार्थ यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी अमरजित पाटील यांनी केलीय.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आता यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले, पार्थ पवार यांना उमदेवारी द्यायची की नाही, याबाबत शरद पवार साहेब, अजितदा आणि तिथले पालकमंत्री निर्णय घेतील. कार्यकर्ते बोलून जातात पण निर्णय नेते घेत असतात. योग्य तो न्याय तिथे असलेल्या लोकांना दिला जाईल, असा विश्वास देखील रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केला. परिस्थिती आणि कार्यकर्त्यांची मागणी लक्षात घेतली जाईल. कोणी अशी मागणी केली, म्हटलं म्हणून लगेच ती पूर्ण होईलच असंही होत नाही, असंही रोहित पवार यांनी यावेळी सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’