‘त्या’ मुलीला न्याय हा नक्की मिळेल! पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी रोहित पवारांची सूचक प्रतिक्रिया

अहमदनगर । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून (Pooja Chavan Suicide Case)राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना आमदार आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर येताच शिवसेनेच्या अडचणीत वाढत आहेत. भाजपनं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण लावून धरत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केलं आहे. भाजपकडून संजय राठोडांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यावर महाविकास आघाडीतील नेते सावध भूमिका घेत प्रतिक्रिया देत आहेत.

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही संजय राठोड आणि पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी सूचक प्रतिक्रिया दिलीय. अहमदनगर येथे ते पत्रकारांशी बोलत होते. संजय राठोड यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू आहे. अशा अनेक वेगवेगळ्या चर्चा होतात, मात्र त्या मुलीला न्याय हा नक्की मिळेल, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केलाय.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार की नाकारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राठोड यांच्या राजीनाम्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालीय. पोलीस महासंचालक हेमंत नगराळे पुण्यात दाखल झाले असून, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची माहिती घेणार असल्याचं कळतंय.

 

You might also like