हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज पासून सुरू होत झाले आहे. याच दरम्यान, अधिवेशानापुर्वी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. त्यातच राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय दौंड यांनी शीर्षासन केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केलेल्या विधानाचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार निषेध केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय दौंड यांनी चक्क शीर्षासन करत आपला राग व्यक्त केला. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज्यपालांचे करायचं काय, खाली डोकं वर पाय … राज्यपालांना हटवा महाराष्ट्र वाचवा अशा घोषणा दिल्या.
दरम्यान, सत्ताधाऱ्यांचा गोंधळ पाहता राज्यपाल अभिभाषण सोडून निघून गेले. इतकेच नाही, तर ते राष्ट्रगीतालाही थांबले नाहीत. यानंतरही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल विरोधात आपल्या घोषणा सुरूच ठेवल्या.