मुख्यमंत्र्यांवर टीका करताना राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांचं वादग्रस्त विधान; म्हणाल्या की,

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “एकनाथ शिंदे कामाख्या देवीला जातात, पण त्यांना राज्यातील देवी दिसत नाही, कारण तिथे जादूटोणा चालतो. मुख्यमंत्रीच जादूटोणा करत असेल, तर त्यांनाच आधी जेलमध्ये टाकले पाहिजे. भोंदूगिरी करणारे बाबाच भगवी वस्त्र धारण करतात, मुख्यमंत्रीही भोंदूगिरी करतात, त्यामुळे त्यांचं महागाईकडे लक्ष नाही,” असे वादग्रस्त विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना केले आहे.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने सुरू असलेल्या जनजागर यात्रेवेळी विद्या चव्हाण यांनी हे वक्तव्य केले. यावेळी त्या म्हणाल्या की, आम्ही सावित्रीच्या लेकींचा जागर सुरू केला आहे. हा जागर महागाई बेरोजगारी संदर्भात आहे. गेल्या 7-8 वर्षांमध्ये मोदींची सत्ता आल्यापासून नुसत्या घोषणा होत आहेत. वास्तविक पाहता खाजगीकरणामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. पेट्रोल-डिझेल यांनी शंभरी पार केली आहे. परिणामी अशा गोष्टींमुळे आज महागाई वाढली आहे. सगळ्या अन्नपदार्थांवर 5 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे.

आपण अकार्यक्षम आहोत हे जनतेला सांगण्यापेक्षा रोज नवीन काही तरी वाद निर्माण करायचा आणि लोकांचं लक्ष विचलित करायचं, हे प्रकार सगळीकडे सुरू आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने महागाई आणि बेरोजगारीवर बोलले पाहिजे, पण कुणीच काही बोलत नाहीत. याउलट त्यांच्याकडून कधी भगव्याचे राजकारण केले जाते, कोणीतरी भगवा धारी येतो, योगी येतात. मी सुद्धा हिंदू आहे, असे म्हणतात. नवीन वर्षाच्या सुरूवातीला सर्व मंदिरांमध्ये मोठी गर्दी होती, पण कुणी भगवी वस्त्र घातली नव्हती. भगवा हे त्यागाचं प्रतिक आहे, भोगीचं नाही. हे लोक भगवा घालून फिरतात ते चुकीचे असल्याचे चव्हाण यांनी यावेळी म्हंटले.