हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या अभिनयाच्या कौशल्याने मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे व तडफदार भाषणशैलीमुळे ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. न्याबाबतची माहिती खुद्द अमोल कोल्हेंनी ट्वीट करत दिली असून त्यांनी महत्वाचे आवाहनही केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरु आहे. खासदार कोल्हे यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले होते. त्यानंतरही त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी एक ट्विट केले असून त्यामध्ये त्यांनी प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.
अमोल कोल्हे यांनी एक ट्वीट केलं असून त्यामध्ये त्यांनी कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला कोरोना सदृश लक्षणे दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसींचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत. तरी टेस्ट केल्यानंतर माझा RT-PCR रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे. परंतु प्रकृती स्थिर आहे. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत.
डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत.मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत.माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन आहे की त्यांनी लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करून घ्यावी.शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत. निर्धारीत नियमांचे काटेकोर पालन करावे.
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) August 20, 2021
मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन आहे की, त्यांनी लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत. निर्धारीत नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आपल्या ट्विटमध्ये डॉ. कोल्हे यांनी म्हंटले आहे.
सध्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली असली तरी राज्य सरकारकडून कोरोनाचे नियम पाळण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आलेले आहे. मात्र, राजकीय कार्यक्रमांमुळे लोकप्रतिनिधींनीही कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. मतदारसंघातील कामे, राजकीय दौरे यामुळे लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण होते.