खासदार अमोल कोल्हे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्य सरकारच्यावतीने राज्यातील चित्रपटगृह व नाट्यगृहांबाबत नुकताच एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे 21 ऑक्टोबरपासून 50 टक्के क्षमतेने नाट्यगृह सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र, त्याबाबत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंना पत्र लिहिले असून त्यात “राज्यातील थिएटर्स 100 टक्के क्षमतेने सुरु करावीत, अशी मागणी केली आहे.

डॉ. कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात म्हंटले आहे की, येत्या 21 ऑक्टोबरपासून सरकारने 50 टक्के क्षमतेने नाट्यगृह सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे. परंतु राज्य सरकारने हा निर्णय मागे घेऊन राज्यातील थिएटर्स 100 टक्के क्षमतेने सुरु करावेत. कारण कोरोना काळातल्या लॉकडाऊनमुळे आणि शुटिंग्ज बंद असल्याने अगोदरच कलाकारांची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यामुळे राज्यातील थिएटर्स 100 टक्के क्षमतेने सुरु करुन कलाकारांना दिलासा द्यावा.

डॉ. अमोल कोल्हे यांनी आता राज्यातील नार्यगृ व चित्रपट गृहांसदर्भात आपली बाजू मांडत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चित्रपटगृह चालकांच्या सध्याच्या चाललेल्या बिकट स्थितीबाबत माहिती दिली आहे. तसेच या चित्रपटगृहचालकांना राज्य सरकारने दिलासा द्यावा, अशी मागणीही केली आहे.

Leave a Comment