जे स्वतःला चाणक्य समजतात, त्यांच्यावर मात करणारे शरद पवार हेच ‘चाणक्य’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा चाणक्य असा उल्लेख करत विरोधकांवर निशाणा साधला. जे स्वतःला चाणक्य समजतात, त्यांच्यावर मात करणारे शरद पवार हेच ‘चाणक्य’ अस म्हणत आम्ही सर्वाना एकत्र घेऊन आघाडी करणार आहे असं नवाब मलिक यांनी म्हंटल.

शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येतील अस कुणीही स्वप्नात पहिले नव्हते. तशीच परिस्थिती देशात आहे. बरेच लोक एकत्र येतील अशी कधी चर्चा होत नाही. या सर्वांची मोट बांधण्याचे काम पवार करतील. सर्वांना एकत्र आणायचा आहे त्या दृष्टीने पवार काम करत आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

आम्हाला या देशात ममतादीदी, टीआरएस, सपा, आरजेडी, दक्षिणेतील पक्ष या सर्वांची मोट बांधायची आहे. कॉंग्रेससह एक नवीन आघाडी तयार करायची आहे. सामूहिक नेतृत्व निर्माण करुन ही आघाडी काम करेल, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

You might also like